रिक्षा चालक 1500 ₹ ऑनलाईन अर्ज www.transport.maharashtra.gov.in रिक्षाचालक अनुदान योजना | auto rickshaw 1500 rs scheme registration

...रिक्षाचालक 1500 ₹ ऑनलाईन अर्ज ...

https://transport.maharashtra.gov.in/

...रिक्षाचालक अनुदान योजना...


🎊 राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोना काळात दीड हजार रु.1500 /-₹ अर्थसहाय्य देण्याची ऑनलाईन प्रक्रिया येत्या 22 मेपासून सुरु होत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘आय.सी.आय.सी.आय(I.C.I.C.I BANK ) बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

◆ कोणतीही कागदपत्रं सादर न करता वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर ऑनलाईन भरायची आहे. संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांच्या खात्यात तत्काळ दीड हजारांची 1500 /-₹ आर्थिक मदत जमा होईल.


 ◆ परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1500/- एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.


◆ याबाबत कार्यप्रणाली ‘आय.सी.आय.सी.आय’( I.C.I.C.I BANK ) बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. दि. 22 मे 2021 पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल.

 ◆ ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना :-

  1. महाराष्ट्र राज्यातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकअर्ज करू शकतील.

  2. आपले वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि आधार क्रमांक तयार ठेवा.

  3. ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.

  4. तुमचा आधार लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर पाठविलेल्या ओटीपीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाईल.याचा फायदा थेट आधार लिंक बँक खात्यात वर्ग केला जाईल.

  5. कुटुंब सदस्याच्या नावे परवाना हस्तांतरण केले असल्यास अर्जदाराने “वारसा/ उत्तराधिकारी” हा पर्याय निवडावा व परवान्याची प्रत अपलोड करावी.

  6. आपण अर्ज भरताना दिलेला मोबाइल नंबर वापरुन आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता. 

     ◆ महत्वाच्या लिंक्स -

आधार अर्ज करण्यासाठी किंवा मोबाइल नंबर अद्यावयात करण्यासाठी नोंदणी केंद्राची यादी - येथे क्लिक करा

आधारशी जोडलेल्या बँक खात्याची स्थिती तपासण्यासाठी - येथे क्लिक करा

आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकाची स्थिती तपासण्यासाठी - येथे क्लिक करा

 ◆ परवाना धारक ऑटो रिक्षा चालक याना आर्थिक सहाय्य या योजनेत आपण ऑनलाइन फॉर्म कसा भराल संपूर्ण माहिती करिता pdf पहा .


Apply करण्यासाठी क्लिक करा


जर आपल्याकडे आधार किंवा आधार लिंक केलेला मोबाइल नंबर बँक खाते नसेल तरीही आपण ऑफलाइन मोडद्वारे योजनेसाठी अर्ज करू शकता. ऑफलाईन मोडद्वारे अर्ज करण्यासाठी 01 जून 2021 नंतर कार्यालयीन वेळेत कृपया आपल्या जवळच्या आरटीओ कार्यालयाला भेट द्या.

👉 CSC नवीन योजना | PM-KISAN | PM-FBY | PM-JAY | PM-SYM | PM-AY | PM-KVY | PM-SBY | PM-JDY | PM-APY | PM-MY | PM-VVY | PM-ABY | PMG-DISHA | ऑनलाईन अँप्लिकेशन्स | महाराष्ट्र शासन योजना WhatsApp वर जाईन करण्यासाठी क्लिक करा 

👉व्हाट्सएप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा

Post a Comment

1 Comments

Please Do not enter any spam link in comment box.