पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू Apply for various schemes under Animal Husbandry Department

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू 2022-2023 

#पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Updates On 05 Dec 2022
  • दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे

  • शेळी-मेंढी गट वाटप करणे

  • १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे 

  • १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप 

  • डेअरी, पोल्ट्री किवा शेळीपालन

◆ राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

◆ विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजने अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता या बरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. 

◆ यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पुढील ५ वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्‍य होणार आहे.

◆ त्यानुसार नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबवली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक /शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

◆ योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अँपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्‍त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.

◆ अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

अर्जदार नोंदणी करण्यापुर्वी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात

योजना क्र.01

दोन दुधाळ गाई / म्हशी चे वाटप करणे .

संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप :
1.सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
बाब
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1
संकरित गाई /म्हशी चा गट - प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे
८०,०००
2
जनावरांसाठी गोठा
3
स्वयंचलित चारा कटाई यंत्र
4
खाद्य साठविण्यासाठी शेड
5
५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा
५,०६१

एकूण प्रकल्प किंमत
८५,०६१
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
                                    
६३,७९६
1
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
                                    
२१२६५. ३३
2
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
                                    
४२,५३१
2
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
                                    
४२,५३१

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

योजना क्र.02

 अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .
अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1
शेळ्या खरेदी
८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )
2
बोकड खरेदी
१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )
3
शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )
4
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित

एकूण खर्च

१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1
मेंढया खरेदी
१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )
नरमेंढा खरेदी
१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )
3
मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
गट
प्रवर्ग
एकूण किंमत
शासनाचे अनुदान
लाभार्थ्याचा स्वहिस्सा
1
शेळी गट - उस्मानाबादी /संगमनेरी
सर्वसाधारण
१,०३,५४५/-
५१,७७३/-
५१,७७२/-
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९/-
२५,८८६/-
2
शेळी गट - अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण
७८,२३१/-
३९,११६/-
३९,११५/-
अनु. जाती व जमाती
७८,२३१/-
५८,६७३/-
१९,५५८/-
3
मेंढी गट - माडग्याळ
सर्वसाधारण
१,२८,८५०/-
६४,४२५/-
६४,४२५/-
अनु. जाती व जमाती
१,२८,८५०/-
९६,६३८/-
३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण
१,०३,५४५/-
५१,७७३/-
५१,७७२/-
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९/-
२५,८८६/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत 
 
योजना क्र.3

 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .
2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)
२)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )
३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं १ ते ३ मधील)

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल.
अ.क्र.
तपशील
लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात)
एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
1
जमीन
लाभार्थी
स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
2
पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण
लाभार्थी / शासन
2,00,000/-
3
उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ.
लाभार्थी /शासन
25000/-

एकूण खर्च

2,25,000/-
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
1
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
                                    
१,६८,७५०/-
1
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
                                    
५६,२५०/-
2
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
                                    
१,१२,५००/-
2
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
                                    
१,१२,५००/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

योजना क्र.04

 १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप :-
१. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
2. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .
अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1
शेळ्या खरेदी
८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )
2
बोकड खरेदी
१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )
3
शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )
4
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित

एकूण खर्च

१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1
मेंढया खरेदी
१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )
नरमेंढा खरेदी
१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )
3
मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित

एकूण खर्च

१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र.
तपशील
दर(रक्कम रुपयात )
१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1
मेंढया खरेदी
१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )
नरमेंढा खरेदी
१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )
3
मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित

एकूण खर्च

१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
गट
प्रवर्ग
एकूण किंमत
शासनाचे अनुदान
लाभार्थ्याचा स्वहिस्सा
1
शेळी गट - उस्मानाबादी /संगमनेरी
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९/-
२५,८८६/-
2
शेळी गट - अन्य स्थानिक जाती
अनु. जाती व जमाती
७८,२३१/-
५८,६७३/-
१९,५५८/-
3
मेंढी गट - माडग्याळ
अनु. जाती व जमाती
१,२८,८५०/-
९६,६३८/-
३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जाती
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९/-
२५,८८६/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

योजना क्र.05

 दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे .

टीप :-
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
बाब
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1
संकरित गाई /म्हशी चा गट - प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे
८०,०००
2
५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा
५,०६१

एकूण प्रकल्प किंमत
८५,०६१
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
                                    
६३,७९६

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

 योजना क्र.06

 ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे 

टीप :-
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
बाब
जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1
पक्षी किंमत
३,००० /-
2
खाद्यवरील खर्च
१,४०० /-
वाहतूक खर्च
१५० /-
औषधी
५० /-
रात्रीचा निवारा
१,००० /-
खाद्याची भांडी
४०० /-

एकूण किंमत
६,००० /-
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1
सर्व प्रवर्ग ५० टक्के
                                    
३,००० /-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

योजना क्र.07

 एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे .

टीप :-
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
बाब
एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1
पक्षी किंमत
२,००० /-
2
खाद्यवरील खर्च
१२,४०० /- (८०० किलोग्रॅम)
वाहतूक खर्च
१०० /-
औषधी
१५० /-
रात्रीचा निवारा
१,००० /-
खाद्याची भांडी
३५० /-

एकूण किंमत
१६,००० /-
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1
सर्व प्रवर्ग ५० टक्के
                                    
८,००० /-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट

: अर्ज करण्याचा कालावधी :
18-11-2021 ते 17-12-2021

टोल फी क्रमांक :
1962 /1800- 233-0418

Post a Comment

0 Comments