10वी 12वी मार्च 2024 साठी 17 नंबर फॉर्मची ऑनलाईन नोंदणी सुरु 10th 12th Online Registration of Form No. 17 For 2024

दहावी व बारावी मार्च 2024 च्या थेट खाजगी परिक्षेसाठी फॉर्म नंबर 17 ची ऑनलाईन नोंदणी सुरु | 10th and 12th Online Registration of Form No. 17 |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळउच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा फेब्रु मार्च २०२४ च्या परीक्षेस खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होणाऱ्या विद्याथ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत.

संदर्भ या कार्यालयाचे पत्र क. रा.म. / परीक्षा- ३/३४६७, दिनांक ०८/०८/२०२३.

New फेब्रु मार्च २०२४ परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने स्विकारण्याचा कालावधी इयत्ता १०वी साठी दि. १४ ऑगस्ट २०२३ ते दि. ११ सप्टेंबर २०२३ व इ. १२ वी साठी दि. १० ऑगस्ट २०२३ ते दि.११ सप्टेंबर २०२३ पर्यंत निश्चित करण्यात आला होता. नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज सादर करण्याची निर्धारीत मुदत संपल्यानंतर नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. इ. १० वी व इ. १२वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी मुदतवाढ


इ. १० वी व इ. १२वी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा


बुधवार दि. २०/०९/२०२३ ते शनिवार दि. ३०/०९/२०२३

https://chat.whatsapp.com/G8ebM0d58X7FPqLBNFh41H

✍️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं.17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
👉 त्यानुसार सन 2024 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस खाजगीरित्या (फॉर्म नं.17) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं.17) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे भरुन घेण्यात येणार आहेत.


◆ इ.10 वी व इ.12 वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत.


खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (FORM 17) ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल सादर पोचपावती स्वतः जवळ जतन करून ठेवण्यात यावी.


एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्या नंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नावनोंदणी अर्जात दूरस्ती करावयाचे असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च अर्ज सादर करून नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्याने नोंद घ्यावी.


ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल Payment Success झाल्यास व तांत्रिक कारणास्तव पोचपावती न भेटल्यास दुबार payment करू नये,केलेल्या payment ची पावती २४ तासात सांकेतिक स्थळावर उपलब्ध होईल.

 

आपले आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला(द्वितीय प्रत असल्यास प्रतिज्ञापत्र) अधिवास /स्थलांतर दाखला,फोटो आपल्या सोबत ठेवा. माहिती भरलेल्या अर्जाची PRINT काढून तो आपल्या अर्जात नमुद केलेल्या शाळेत जमा करावयाचा आहे.

विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे

 ◆ खाजगी विद्यार्थ्यांनी इ 10 वी व इ.12 वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा.


◆ विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता  -

a) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीय प्रत व प्रतिज्ञापत्र 

b) आधारकार्ड 

c) स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो 

स्वत:जवळ ठेवावा.

◆ ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यानी स्कॅनर/मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत.

◆ विद्यार्थ्यांचा मोबाईल कमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.


◆ संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी.


◆ विद्यार्थ्यानी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.

 

📤 खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे :-

इ.10 वी -  नोंदणी शुल्क रू.1000/- प्रक्रिया शुल्क रु. 100/-

इ.12 वी - नोंदणी शुल्क रू. 600/-  प्रक्रिया शुल्क रु. 100/-

 

◆  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्याची नाव नोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे.

 

◆ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यमनिहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. त्या कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज, प्रकल्प प्रात्यक्षिक/ तोंडी, श्रेणी परीक्षा दयावयाची आहे.


◆ इ.10 वी व इ.12 वी साठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नं.17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य राहिल. ऑनलाइन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल.


◆ सदर पोचपावती स्वतःजवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही.


◆ तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केन्द्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.


◆ दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या/ प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/ कनिष्ठ महाविद्यालय / संपर्क केन्द्र यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.


◆ विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी.


◆ पात्र विद्यार्थ्याना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (exam form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.

 ◆ एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्या नंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नावनोंदणी अर्जात दूरस्ती करावयाचे असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च अर्ज सादर करून नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्याने नोंद घ्यावी.

◆ Payment success झाल्यास व तांत्रिक कारणास्तव पोचपावती न भेटल्यास दुबार payment करू नये आपण केलेल्या payment ची पावती 24 तासात सांकेतिक स्थळावर उपलब्ध होईल.
https://chat.whatsapp.com/G8ebM0d58X7FPqLBNFh41H

************************************************

इयत्ता 10 वी फॉर्म नंबर 17 फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी क्लिक करा

इयत्ता 10 वी फॉर्म नंबर 17 अँप्लिकेशन रीप्रिंट करण्यासाठी क्लिक करा

इयत्ता 10 वी फॉर्म नंबर पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी क्लिक करा

************************************************

इयत्ता 12 वी फॉर्म नंबर 17 फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी क्लिक करा

इयत्ता 12 वी फॉर्म नंबर 17 अँप्लिकेशन रीप्रिंट करण्यासाठी क्लिक करा

इयत्ता 12 वी फॉर्म नंबर पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी क्लिक करा

************************************************

Post a Comment

0 Comments