फक्त 2 मिनिटात करा मतदान आणि आधार कार्ड लिंक link aadhaar card with voter id


फक्त 2 मिनिटात करा आपले मतदान आणि आधार कार्ड लिंक

How to link aadhaar card 

with voter id

मतदार ओळखपत्र आधारशी असे करा लिंक...

आधार आणि मतदार ओळखपत्र लिंकिंग :- मतदार ओळखपत्र आधारशी कसे लिंक करावे ? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे त्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा.

भारतीय निवडणूक आयोग ECI INDIA ने लोकांना त्यांचे आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. ECI ने निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021 च्या प्रकाशात मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी सरकारने अद्याप कोणतीही अंतिम मुदत जाहीर केलेली नाही. भारतीय निवडणूक आयोग (ECI) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संसदेने स्वीकारलेल्या निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021 अंतर्गत प्रत्येकाला त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यास सांगत आहे.

आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक करण्यासाठी खालील पध्दत वापरा..

दोन ओळखपत्रे लिंक करण्यामागील कल्पना म्हणजे

◆ मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करणे

◆ मतदारांची ओळख प्रमाणित करणे

◆ एखाद्या व्यक्तीची एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळानोंदणी आहे की नाही हे तपासणे   

◆ एखाद्या व्यक्तीची एकाच मतदारसंघात , अनेक मतदारसंघात नोंदणी आहे की नाही हे तपासणे.


भारतीय निवडणूक आयोग (ECI) ने अद्याप मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक फोटो ओळखपत्र (EPIC) शी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केलेले नाही.

आधार क्रमांक न दिल्यास मतदाराचे नाव मतदार यादीतून काढले जाणार नाही, असे निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन मतदार ओळखपत्राशी लिंक करायचे असेल, तर खालील पद्धत वापरा

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी कसे लिंक करावे ?


STEP 1: Google Play Store आणि Apple App Store वरून Voter Helpline अँप डाउनलोड करा.
(Direct App Download Link खाली दिली आहे)

Step2: App Open करा आणि 'I Agree' पर्यायावर क्लिक करा आणि 'Next' वर क्लिक करा.

 




Step 3: पहिला पर्याय Voter Registration ('मतदार नोंदणी') वर Click करा.




Step 4: Electoral Authentication Form (इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म फॉर्म 6B) वर क्लिक करा.

 




Step 5: 'Lets Start' वर क्लिक करा.

Step 6: आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा मोबाइल नंबर टाका त्यानंतर ओटीपी पाठवा वर क्लिक करा.

 




Step 7: तुम्हाला मिळालेला OTP एंटर करा आणि 'Verify' वर क्लिक करा.

Step 8: Yes I Have Voter ID वर क्लिक करा आणि नंतर 'Next' वर क्लिक करा

 




Step 9: तुमचा मतदार आयडी क्रमांक (EPIC) एंटर करा, तुमचे राज्य निवडा आणि 'Fetch Details' वर क्लिक करा

 




Step 10: 'प्रोसीड' वर क्लिक करा.

Step 11: आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि तुमचे प्रमाणीकरणाचे ठिकाण भरा आणि 'Done' वर क्लिक करा.




जर तुम्ही आधार कार्ड तयार केले नसेल तर दुसरा ऑपशन (I am not able to furnish my Aadhaar Number ) निवडावा लागेल व खाली दिलेली कागदपत्रे (लायसन्स, पॅन कार्ड इ.) अपलोड करावी लागतील.

Step 12: फॉर्म 6B चे Preview पेज उघडेल. तुमचे तपशील पुन्हा तपासा आणि तुमचा फॉर्म 6B च्या अंतिम सबमिशनसाठी 'Confirm' वर क्लिक करा.

 




फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स आयडी (Reference Id) मिळेल तो रेफरन्स आयडी मिळेल तो आपण प्रिंट काढून ठेवू शकता त्यानंतर आपण ॲप मध्ये गेल्यानंतर चेक स्टेटस मध्ये Reference Id टाकल्यानंतर आपल्याला स्टेटस दिसेल. जेव्हा नवीन मतदान कार्ड येतील त्यावेळेस आपल्याला नवीन मतदान कार्ड आपल्या  पत्त्यावर मिळेल.
 

अश्या प्रकारे आपण आपले आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करू शकता.

Tags :-
link aadhar to voter id online | link aadhar to voter id card | voter card aadhar card link | form 6b kaise bhare | form 6b eci | form 6b election | link aadhar to voter | voter id card new update | link voter id to aadhaar online| link voter id to aadhaar card | voter helpline app| voter id, voter id card news | aadhar card link to voter id | link voter to aadhar |

Post a Comment

0 Comments